ब्राह्मण समाजा तर्फे निवेदन सादर

उमरखेड :- बीड जिल्ह्यातील पिंपरगव्हाण येथे ब्राह्मण कुटुंबावर हल्ला करण्यात त्याचा निषेधार्थ ब्राह्मण समाजाकडून उपविभागीय अधिकारी यांना आज दिनांक २० मे रोजी निवेदन देण्यात आले

नुकतीच महाराष्ट्रात १३ मे रोजी लोकसभेची निवडणूक पार पडली असून चौथ्या टप्प्यात बीड लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानामध्ये पिंपरगव्हाण, ता. जि. बीड येथील राऊतमारे कुटूंबाने तुतारी या निवडणूक निशाणी समोर बटन दाबून मतदान न केल्यामुळे राऊतमारे कुटूंबावर जीवघेणा हमला करण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्रात आशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करुन मनाविरुध्द मतदान केल्यामुळे झालेली मारहाण व जीवघेणा हमला हा निषेधार्य आहे. सदर घटनेचा उमरखेड तालुक्यातील व शहरातील ब्राह्मण समाज निषेध व्यक्त करतो. तसेच लोकशाही मध्ये निवडणूका ह्या भयमुक्त वातावरणात होणे अपेक्षित असतांना एका विशिष्ट समाजाला टारगेट करुन झालेल्या या हमल्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे या वेळी ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष अजय बेदरकर, मधुसूदन पांडे, महेश काळेश्वरकर, सुनिल वानरे, विजय पाध्ये, विवेक आडे,ऍड रविकांत पांडे, संतोष देव, मनोज पांडे, हेमंत चौधरी, विजय कान्नव, संतोष पोटे, संदीप महाजन, सुधीर पोटे, कल्पना पांडे, माधुरी देशमुख, उज्वला पळसकर, स्मिता पोटे,सुचिता जोशी व असंख्य समाज बांधव व महिला उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *