विविध स्पर्धेचे आयोजन
उमरखेड श प्र :
महेश नवमी हा माहेश्वरी समाजाचा सर्वात मोठा सण आहे .हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला महेश नवमी साजरी केली जाते .
माहेश्वरी समाज प्रामुख्याने भगवान महेश आणि देवी पार्वतीच्या पूजेला समर्पित आहे .
येथील माहेश्वरी मंडळातर्फे आयोजित शनिवार रोजी विविध कार्यक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी केली यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले . महेश नवमी निमित्त माहेश्वरी मंडळातर्फे धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले शनिवारी सायंकाळी 4 वाजता सजवलेल्या रथात भगवान महेश व पार्वती माता यांची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
येथील भंडारी ऑइल मिल येथून निघालेल्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली .शोभायात्रा मार्गक्रम करत गायत्री चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ,हनुमान मंदिर ते राजस्थानी भवन येथे शोभा यात्रेचे समारोप करण्यात आले .
यावेळी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, पुरुषांनी उपस्थितांचे लक्ष वेधले या मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ,येथील राजस्थानी भवन येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते विविध सामाजिक कार्यक्रम व विविध गुणवंत विद्यार्थी व स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर भव्य रक्तदान शिबिर व संपूर्ण शरीर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले व यावर्षीच्या स्व सौ सरोजदेवी बन्सीलालजी भंडारी प्रतियोजित महेश भूषण पुरस्कार स्व. हनुमानदासजी रामचंद्रजी बजाज यांना देण्यात आला . तसेच सांयकाळी आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष मनोहरजी लड्डा उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म्हणून राजस्थानी मंडळ चे अध्यक्ष मांगीलालजी जांगिड हे होते तर प्रमुख उपस्थितीत राजस्थानी महिला मंडळ अध्यक्ष श्रीमती सरिता अग्रवाल , उमरखेड माहेश्वरी संघटना अध्यक्ष मनोज माहेश्वरी ,माहेश्वरी महिला संघटन अध्यक्ष संगीता तेला ,माहेश्वरी युवा संघटना अध्यक्ष निलेश भराडे सी ए, यवतमाळ जिल्हा युवा संघटना अध्यक्ष कपिल भंडारी व तिन्ही संघटनेचे सचिव आनंद तेला, कविता तेला ,आयुष बाहेती व महेश नवमी 2024 उत्सव समितीचे संयोजक गोविंद सोमाणी यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .