फुलचंद भगत
वाशीम : संत सेवालाल महाराज संस्थान आययूडीपी वाशिम येथे गोरनायकण बंजारा महिला संघटना महाराष्ट्र राज्य शाखा वाशिम चा पदग्रहण सोहळा 20 जुलै रोजी पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष लागवड करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ छायाताई सुभाष राठोड यवतमाळ अध्यक्ष गोर नायकण बंजारा संघटना महाराष्ट्र राज्य व सचिव लता ताई आत्माराम राठोड अकोला, कोषाध्यक्ष सौ अनिता ताई पवार अमरावती उपाध्यक्ष नलिनीताई पवार नागपूर उपाध्यक्ष सीमा प्रकाश राठोड वाशिम शांताताई राठोड बीड सल्लागार बीड महाराष्ट्र राज्य लताताई प्रेमसिंग राठोड वाशिम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बंजारा गोर नायक संघटना चा पदग्रहण सोहळा पार पडला. कार्यक्रमाला संघटना स्थापनेच्या मागील हेतू प्रास्ताविकामधून उपाध्यक्ष सीमा प्रकाश राठोड महाराष्ट्र राज्य यांनी तळागाळातील महिलांचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास करण्याचा मानस संघटनेचा असल्याबाबत मत व्यक्त केले.
तसेच गरजू महिलांना विविध रोजगार देऊन सक्षम बनवण्याचा हेतू असल्याचे सुद्धा विवेचन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथमताच बंजारा गोरनायकण महिला संघटनेची स्थापना होत असल्याचा आनंद सर्व बंजारा भगिनीच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि तो आनंद सर्वांनी बंजारा नृत्य करून सादर केला. अध्यक्षीय भाषणात छायाताई राठोड यांनी विविध बाबींचा परामर्श घेतला. संघटनेमध्ये आपली जबाबदारी ओळखून कार्य करावे. घर परिवार सांभाळून संघटनेची जबाबदारी सुद्धा पार पाडायची आहे, असे आवाहन सौ छायाताई यांनी केले. बंजारा गोर नायकण महिला संघटना शाखा वाशिमच्या नवनियुक्त अध्यक्षा सौ पानुताई जाधव व सचिव म्हणून रेणूताई विजय जाधव यांची नेमणूक करण्यात आली. वाशिम येथील बंजारा बहुसंख्य महिलांची पदाधिकारी आणि सदस्य नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच वाशिम शहरातील नामांकित बंजारा महिला डॉक्टर्स यांचे डॉक्टर्स डे चे औचित्य साधून वृक्ष देऊन सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाला वाशिम तांड्याचे नायक कारभारी व प्रमुख अतिथी व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता संस्थानचे महाराज नेमीचंद चव्हाण यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मनीषा विपुल पवार व रेणुताई विजय जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन ताई जयसिंग जाधव यांनी केले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206