section and everything up until
* * @package Newsup */?> अल्पवयीन वाहन चालकांचा मंगरूळपीर शहरासह ग्रामीण भागात सुळसुळाट | Ntv News Marathi

कायद्याचा धाक नाही की विभागाची डोळेझाक?

आरटीओ आणी पोलीस विभागाने लक्ष देण्याची गरज

फुलचंद भगत
वाशीम:-अल्पवयीन शाळकरी विद्यार्थी व अन्य अल्पवयीन मुलांच्या हातात स्कूटर, मोटार सायकल,पल्सर ही वाहने दिसून येत असून सुसाटपणे धावणाऱ्या या वाहनांचा सुळसुळाट हा रस्त्यांवर चालणाऱ्या लोकांसह इतर वाहनधारक व स्वतः अल्पवयीन वाहन चालकासाठी धोकादायक व अपघाताला निमंत्रण ठरत आहे.
विनापरवाना अल्पवयीन वाहन चालकांमुळे त्यांच्यासह मार्गावरील वृद्ध नागरिक, शाळकरी विद्यार्थी, वाहनधारक व पादचाऱ्यांचे देखील जीव धोक्यात येऊ शकतात. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद असली तरी कारवाईची कठोरतेने अंमलबजावणी होत नसल्याने त्यांचे मनोधैर्य वाढत असून सुसाट धावणारी ही वाहने मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. दुचाकी वाहनावर किती प्रवासी बसावेत याचे भान देखील हे अल्पवयीन विनापरवाना वाहनधारक ठेवत नसल्याचे दृष्टीस पडत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १८ वर्षांखालील अल्पवयीन वाहन चालवणारे वाहन चालक, मालक व पालक यांच्यावर मोटार वाहन कायदा व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मोहीम पोलीस यंत्रणेने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. याप्रकरणी संबंधित पालकांवर गुन्हे दाखल करून न्यायालयात खटले दाखल करावेत अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

कायद्याची जनजागृती आणी जबाबदारीची जाणीव गरजेची

अल्पवयीनाने वाहन चालवणे अशा गुन्ह्यात तीन वर्षापर्यंत शिक्षा व २५ हजार रुपये दंड व अल्पवयीन मुलांना वयाच्या २५ वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळणार नाही अशा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. शालेय जीवनावर शालेय जीवनातच मुलांना वाहतुकीचे नियम शिकविले जातात मग शाळकरी मुलांना शाळेत, महाविद्यालयात वाहन न आणण्याची जबाबदारी जेवढी पालकांची आहे तेवढीच शाळा व्यवस्थापनाची ही आहे जो विद्यार्थी शाळेत वाहन आणत असेल त्यास वेळीच आळा घालण्याचे कर्तव्य शाळा व्यवस्थापन समितीचे असल्याने या समितीने संबंधित पालक आणि विद्यार्थी यांना शाळेत सदर वाहन आणण्यास प्रतिबंध घालणे गरजेचे आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशीम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *