section and everything up until
* * @package Newsup */?> अहमदनगर-नगरच्या लाचखोरमंडलाधिकारी व तलाठ्यावर गुन्हा दाखल | Ntv News Marathi

सावेडी उपनगरात प्लॉटची नोंद मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या मंडलाधिकारी व तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. मंडलाधिकारी शैलजा देवकाते व तलाठी सागर भापकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराने सावेडीतील १८ हजार चौरस फूट प्लॉटचे महापालिकेकडील रेखांकन करून २२ प्लॉट पाडण्यात आले.

४० हजार रुपये घेण्याची तयारी..
या २२ प्लॉटच्या फेरफार नोंदी ऑनलाइन अपलोड करण्यासाठी ४४ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडी अंती ४० हजार रुपये घेण्याची तयारी मंडलाधिकारी देवकातेंनी दर्शविली होती. तसेच तलाठी भापकरला देण्यासाठी ११ हजार रुपये मागितले होते. ही घटना १९ मार्चला घडली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुन्हा दाखल केला आहे. शैलजा देवकाते या पूर्वी नालेगाव येथे मंडलाधिकारी असतानाही त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.