फुलचंद भगत
वाशिम:-शासकीय स्वस्त धान्य योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्याचे निर्देश आहेत. परंतु सर्व्हर डाउन असल्याने हे ई-केवायसी करताना अडचणी येत असल्याची स्थिती आहे.या मशीन मध्ये तर दोन सिम आहे परंतु एक ही व्यवस्थित चालत नाही.रास्त भाव दुकानदार स्वतःच्या मोबाईल चा हॉटस्पॉट देऊन मशिन चालवतात.शिधापत्रिकाधारकांना ही केवायसी करून घ्यायचे आहे.परंतु याबाबत कुठेही गतीने काम रेशन दुकानदार करीत नसल्याची स्थिती आहे.यामुळे लाभार्थी संभ्रमात आहेत. कारण अनेकांची ई-केवायसी सर्व्हर डाउनच्या समस्येने झालेली नाही.
रेशन दुकान सकाळी सुरू तर दुपारी बंद असते.काही दुकाने फक्त धान्य वाटपासाठी सुरू असतात.यामुळे लाभार्थींना रोज या रेशन दुकानात चकरा माराव्या लागत आहेत.ही केवायसी करताना लाभार्थींच्या बोटांचे ठसे हवे असतात.यामुळे संबंधित लाभार्थींना रेशन दुकानात जावे लागत आहे.परंतु सर्व्हर डाउनमुळे हे काम ठप्प आहे.यात लाभार्थींचा वेळ व खर्च वाया जात आहे.कारण अनेक जण गावाबाहेर खासगी नोकरी,कामानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत.अनेकांची केवायसी तांत्रिक व अन्य अडचणींमुळे पूर्ण झालेली नाही.सर्व्हर डाउन असल्याने हे केवायसी केव्हा पूर्ण होईल,असाही प्रश्न आहे.यामुळे या कामास मुदतवाढ देण्याचीही तयारी पुढे शासनाने ठेवावी,अशी मागणी नागरिक करीत आहे.

ई केवायसी करण्याची मुदत वाढु शकते

ई केवायसी करण्याचे शासनाकडून निर्देश दिले होते.परंतु सर्व्हर डाऊन मुळे तसेच बाहेर गावी कामानिमित्ताने काही नागरिक गेले आहे त्यांची ई केवायसी राहली.नागरिकांनी स्वतः जाऊन ई केवायसी करून घ्यावी.शासनाकडून ई केवायसी ची तारीख वाढणार आहे असे सांगण्यात येत आहे.

शासनाने ई केवायसी सुरळीत करण्याच्या त्वरीत ऊपाययोजना कराव्या
रास्तभाव दुकानदार यांना पुरवठा व केवायसी सोबत करणे अवघड जात आहे.राशनचा माल देण्यासही डिलरला अडचणी येत आहेत.सर्व्हर डाऊन असल्याने केवायसी करण्यात त्रास होत आहे.या मशिनला तर आमच्या मोबाईलचा हॉटस्पॉट द्यावा लागतो.दिलेल्या सिम ने ही मशीन व्यवस्थित चालत नाही शासनाने या वर लवकर उपाय काढणे गरजेचे आहे.संघटनेने याबाबतीत प्रशासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *