कु.निकिता दत्तराज पवार हिने सिव्हिल इंजिनिअर च्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश मिळवत परिक्षा उत्तीर्ण केल्याने तिचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे
जामखेड खर्डा बार्शी सह सर्वच ठिकाणावरून होतो आहे अभिनंदनचा वर्षाव…
जामखेड तालुक्यातील जेष्ठ पत्रकार दत्तराज पवार यांच्या कन्या कु. निकिता पवार यांनी सिव्हील इंजिनियर या अंतिम वर्षातील परीक्षेत सर्वोत्तम जास्त गुण घेऊन उत्तीर्ण केल्याने त्यांचे खर्डा व बार्शी शहरासह अन्य ठिकाणाहुन अभिनंदन केले जात आहे.

याबाबत चे सविस्तर वृत्त असे की जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जेष्ठ पत्रकार दत्तराज पवार यांची कन्या कु निकिता पवार ही बार्शी येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी टेक सिव्हील इंजिनिअर या शेवटच्या वर्षात इंजिनियरिंगचे शिक्षण घेत शिकत होती.
मागील काही महिन्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हरर्सिटी लोणेरे रायगड या युनिव्हरर्सिटीने च्या माध्यमातुन सदरची परीक्षा घेण्यात आली होती. त्याच परीक्षेचा निकाल नुकताच काही दिवसा पुर्वी लागला असून त्यात खर्डा येथील जेष्ठ पत्रकार दत्तराज पवार यांची कन्या कु. निकिता दत्तराज पवार हिने सिव्हील इंजिनियर या इंजिनियरिंग च्या शेवटच्या वर्षातील सत्रात सर्वोत्तम गुण मिळवून इंजिनियर परिक्षेत घवघवीत गुण मिळवून उत्तीर्ण होत डिग्रीचा कोर्स पूर्ण केला असल्याने तिच्या या यशा बद्दल जामखेड तालुक्यासह खर्डा व बार्शी शहरातून तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.त्याचबरोबर खर्डा प्रेस क्लब व जामखेड पत्रकार संघ जामखेड तसेच सर्व पत्रकार संघटना व तालुक्यातील सर्व पत्रकारासह सर्व क्षेत्रातुन निकिताचे अभिनंदन केले जात आहे.
कु. निकिता पवार या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दत्तराज पवार यांच्या कन्या आहेत.

नंदु परदेशी जामखेड
जिल्हा प्रतिनिधी अहमद नगर
मो नं 9765886124