पाथर्डी — आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे कुटुंब सांभाळतांना नाकी नऊ येत असताना आपल्या अवतीभवती असेही काही दानशूर व्यक्ती आहेत की,जे गरजू मुलांसाठी आधारस्तंभ बनलेले आहेत.ते फक्त एक पालनपोषण पुरते मर्यादित नसून त्यांच्यावर योग्य संस्कार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी ते पुरवण्याचे ते काम करतात असे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मोहोजखुर्द येथील जनआधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदर्श शिक्षक सुनील मतकर हे देखील गेल्या काही दिवसांपासून निस्वार्थपणे सुमारे 40 अनाथ मुलांना सांभाळत असून त्यांना परमार्थिक,शैक्षणिक व सामाजिक ज्ञानदान देण्याचे काम करत आहेत,त्यानिमित्ताने मतकर सर यांचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मतकर यांना हा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावशे,प्रदेशाध्यक्ष रोहित पवार,संपर्कप्रमुख अमोल शेवाळे यांच्यासह अनेक विविध गावचे सरपंच व प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.अनाथ ऊस तोडणी कामगार यांच्या मुलांना मानव सेवा संस्थेत सहारा देऊन त्यांना शिक्षण,परमार्थिक ज्ञान देण्याचे काम मतकर सर यांच्याकडून केले जात आहे.एवढेच नव्हे तर उद्योग व्यवसायासाठी या तरुणांना संगणकाचे देखील धडे दिले जात आहेत.मुलांसाठी व्यायाम शाळा,वाचन व्यवस्था तसेच धार्मिक ज्ञान देण्यासाठी श्रीराम वारकरी संघ स्थापन करून या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देण्याचे काम मतकर सर यांच्या माध्यमातून केले जात असून या कार्यामुळेच त्यांना हा पुरस्कार दिला जात असल्याचे बाबासाहेब पावसे यांनी यावेळी सांगितले.मतकर सर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे,सत्यभामा तनपुरे,अनंत महाराज तनपुरे,विश्वस्त आबासाहेब तोडमल,राजेंद्र पाचे,श्री.संत तनपुरे बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब मोरे सर,जोड मोहजचे सरपंच सुधाकर वांढेकर,खांडगावचे सरपंच शिवनारायण ससे यांनी मतकर सरांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिनिधी :– भिवसेन टेमकर Ntv न्यूज मराठी पाथर्डी,अहमदनगर.मो.नं.9373489851.