शिक्षणाधिकारी किरण लोहारचिपळून येथे खाजगी प्राथ. शिक्षक सेवक समितीची शिक्षण परिषद संपन्न .कोल्हापूर : सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत . त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी “हार्ड वर्क ” नव्हे तर ” स्मार्ट वर्क ” करावे असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना ) किरण लोहार यांनी केले .ते चिपळूण येथील महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या शिक्षण परिषद व कोकण विभाग मेळाव्यातील अध्यक्ष पदावरून बोलत होते . शिरगाव, चिपळूण येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय मध्ये ही परिषद संपन्न झाली . या कार्यक्रमासाठी मान्यवर पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी राज अहमद देसाई , समितीचे ‘राज्याध्यक्ष भरत रसाळे , राज्य संघटक बादशाह जमादार आदिती केळकर हे होते .खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्यावतीने कोकण विभागीय अध्यक्ष महेंद्र कापडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोन दिवसाच्या शिक्षण परिषदेचे आयोजन केले होती .या परिदेच्या उदघाटन प्रसंगी “महाराष्ट्र शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजना ” या विषयावर बोलताना किरण लोहार यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठीअसलेल्या 40 योजनांची माहिती देऊन या योजना व दर्जेदार शिक्षण यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी केवळ हार्डवर्क करून उपयोग नाही तर स्मार्ट वर्क केली पाहिजे त्यामुळे आपला वेळ व आपले श्रमही वाचतील आणि कामही दर्जेदार होईल .असे प्रतिपादन केले . तर विस्तार शिक्षण विस्तार अधिकारी राज अहमद देसाई यांनी शिक्षणाची गुणवत्ता ही केवळ शिक्षकांच्या त्यांगावर अवलंबून असल्याचे सांगितले तर मान्यवर पाहुणे म्हणून बोलताना राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी “आमची संघटना ही केवळ शिक्षकांच्या मागण्यावर नाही तर राज्यातील शिक्षणाच्या गुणवता वाढीसाठीही काम करते व अशा शिक्षण परिषदांमधून शिक्षकांना अपडेट ठेवण्यांसाठी प्रयत्न करते असे सांगितले . . बादशहा जमादार, अदिती केळकर , सविता गिरी यांनीही मनोगत व्यक्त केले .दुसऱ्या दिवशीच्या परिषदेमध्ये रत्नागिरी जिल्हा डाएटचे प्राचार्य डॉक्टर सुशील शिवलकर यांनी “महाराष्ट्रातील बदलते शिक्षण आणि शिक्षकाची भूमिका ” याविषयी आपले विचार मांडताना “नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या अंगी असलेल्या कौशल्यावर त्याला विकसित करण्यांसाठी प्राधान्य दिले असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बालपणीच त्यांच्यातील विशेष कल लक्षात घेऊन त्याला घडवावे असे आवाहन केले व यासाठी शिक्षक प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे सांगून शिक्षकांचे कौतुकही केले . अध्यक्ष पदावरून बोलताना महासचिव अंजन पाटील (धुळे ) यादी शिक्षकांना एक संघ राहण्याचे आव्हान केले .यावेळी संतोष शिळीमकर (पुणे ) शशिकांत माळी (सांगली ) दत्तात्रय पाटील ( गारगोटी ) यांनीही आपले विचार मांडले . आभार आशिष मांडवकर यांनी मांडले . सारिका पाटील यांनी सूत्रसंचलन केले . यावेळी विविध जिल्हयांतून नवीन पदाधिकारी निवडून त्यांना निवडपत्रे मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दिली .या परिषदेसाठी राज्यसचिव शिवाजी भोसले , विभागीय अध्यक्ष महादेव डावरे , राज्य उपाध्यक्ष सारंग पाटील , शिक्षकेतर प्रमुख अशोक शिंदे प्रवीण पाटील ,प्रशांत गुरव शिवाजी वळीवडे यांच्यासह राज्यभरातून शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते .(परिषदे मध्ये करणेत आलले ठराव हे चौकटीत वापरावेत ही विनंती )या परिषदेमध्ये केलेले ठराव : शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी .अशैक्षणिक कामे कमी करून शिक्षकांना फक्त शिकवू द्यावे . कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा व आरक्षण घालवणारा शासन आदेश रद्द करावा .शाळा तिथे स्वतंत्र मुख्याध्यापक पद मंजूर व्हावे .शिक्षक भरती ही जिल्हा पातळीवर व्हावी .शाळांना सेवक व टेक्नोसेवी टीचर द्यावेत .शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजनेचा लाभ द्यावा .मेडिकल बिलांच्या प्रतिपूर्तीची शंभर टक्के रक्कम राज्य शासनाने द्यावी .जि . प . शाळांच्याप्रमाणे खाजगी शाळांनाही मोफत गणवेष व इतर सर्व सुविधा मिळाव्यात .संच मान्यता दुरुस्तीचे अधिकार जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मिळावेत .वेतनेतर अनुदान हे अनुदानावर आलेल्या सर्व शाळांना मिळावे व अनुदान रकमांच्यामध्ये वाढ करावीखाजगी शाळानाही जि .प . शाळाप्रमाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावे .अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ खाजगी प्रा .शाळातील मुख्याध्यापकांना मिळावा . यासह विविध 25 ठराव या परिषदेमध्ये करण्यात आले … . ही परिषद यशस्वी करण्यासाठी योगिता लांजेकर , मुग्ध।चक्रदेव ,आशिष मांडवकर , सुधीर मोहिते , माधव चौरे ,रमेश कदम , संदेश सावंत ,अक्षता साळवी ,सरिता मानकर व पूजा लाड यांनी परिश्रम घेतले.