प्रतिनिधी. मुनीर शेख. चिपळूण तालुक्यातील पोफळी गाव महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज.मैनुद्दीन कासिम सय्यद यांची निवड बिनविरोध करण्यात आली. आज नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला अध्यक्षपदाची निवड करत असताना गावातील ग्रामस्थ तसेच श्री दादासाहेब साळवी. श्री.बाबुशेठ साळवी. श्री.श्रीराम पवार. श्री किसनराव पवार .श्री. संजय बामणे. श्री संजय जाधव. श्री वैभव पवार. ज.अब्दुल भाई सय्यद.ज.इब्राहिम भाई सय्यद. ज.युसुफ भाई सय्यद. सरपंच उस्मानभाई सय्यद. ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होता. तसेंच मैनुद्दीन सय्यद अल्पसंख्यांक रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. सर्व स्तरावरून त्यांचा अभिनंदनचा वर्षाव होत आहे.