क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पोकळी प्रशालेने घवघवीत सुयश संपादन केले . या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलींमध्ये अनुष्का कदम,वेदिका बामणे, शर्वरी पवार त्याचबरोबर 19 वर्षाखालील मुलीमध्ये प्रतीक्षा गायकवाड ,संस्कृती मानकर त्याचबरोबर 19 वर्षाखालील मुलामध्ये अथांग कारंडे यांनी उत्कृष्ट खेळ करून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये यश संपादन केले .या सर्व खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली. त्याचबरोबर रत्नागिरी सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्टसॉफ्ट टेनिस निवड चाचणी स्पर्धेमध्ये 14 वर्षे मुली *डबल्स मध्ये अनुष्का कदम व शर्वरी पवार यांनी गोल्ड मेडल मिळवले. या दोन्ही खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली . या सर्व खेळाडूंना प्रशालेची क्रीडा शिक्षक व समुपदेशक श्री यादव सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.