यामध्ये रानभाज्या औषधी वनस्पती यांची ही माहिती सांगण्यात आली. विद्यार्थ्यांना निसर्गाची प्रत्यक्ष अनुभूती देण्यात आली. हलक्याशा पावसाच्या सरीमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षकांबरोबर रांगेत शालेय परिसरातून फिरून आले यादरम्यान विद्यार्थ्यांना नदी,डोंगर, वेली,झाडे यांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. हिरवागार शालू पांघरलेला निसर्ग विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला. मुख्याध्यापक श्री.महेंद्र कापडी सर यांनी शालेय परिसरातील तुळस, टाकळा,अळू इत्यादी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यांचे औषधी गुणधर्म सुद्धा समजावून सांगितले वनस्पतींचे महत्त्व काय आहे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. ज्येष्ठ शिक्षिका सौ .शिवानी शिंदे,सौ.प्रतिभा धुमाळ,श्री.अशोक मिसाळ,सौ.साधना गायकवाड,सौ. मनीषा नाईक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींची माहिती व महत्त्व समजावून सांगितले.
प्रतिनिधी. मुनीर शेख आनंददायी शनिवार ……