परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक शाळा पोफळी येथील पालक व शाळा संयोजक यांच्या उत्तम आर्थिक सहकार्यातून डिजिटल वर्गासाठी 43 इंची स्मार्ट टी.व्ही प्राप्त झाल्याने या डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
या डिजिटल वर्गाच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात पालक शिक्षक कार्यकारिणीचे उपाध्यक्ष श्री.वैभवजी पवार तसेच श्री. प्रेमराज परळीकर यांच्या हस्ते भगवान परशुरामांना पुष्पहार घालून करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. रोहिणी गुळवे व सौ.शिर्के यांच्या हस्ते फीत कापून डिजिटल वर्गात प्रवेश करण्यात आला.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.महेंद्र कापडी सर व ज्येष्ठ शिक्षिका सौ.शिवानी शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले.
सौ.थोरवडे,सौ.शिर्के,सौ.कांगणे,सौ.गुळवे,यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून डिजिटल वर्गातील टीव्ही सुरू करण्यात आला.
पाल्याच्या वाढदिवसानिमित्त पालकांनी दिलेल्या देणगीतून तसेच शाळा संयोजकांच्या मदतीने डिजिटल वर्ग करण्यासाठी 43 इंच टीव्ही बसवण्यात आला आहे.या टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्याना अध्ययन करणे सुलभ होणार असून जगातील ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देता येणार आहे.या कार्यक्रमासाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.शरद सोळुंके सर तसेच त्यांचे सहकारी शिक्षक श्री काणेकर सर, श्री यादव सर, श्री धामापूरकर सर,शिशुविहारच्या कदम मॅडम व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.परशुराम एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी मंडळ सदस्य तसेच शालेय समिती सदस्य श्री.अभयजी चितळे साहेब यांनी डिजिटल वर्गाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक श्री.महेंद्र कापडी सर यांनी उपस्थितांचे तसेच देणगीदारांचे आभार व्यक्त केले व असेच सहकार्य यापुढेही मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.अशोक मिसाळ सर यांनी केले, तर सौ.शिंदे,सौ. धुमाळ,सौ. गायकवाड,सौ.नाईक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यातून समारंभ छान पार पडला..
