देवी,पोफळी-पवारवाडी देवस्थानाला महाराष्ट्र शासनाचा क-वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त झाल्याबद्दल आयोजित आनंद सोहळ्या निमित्त चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री.शेखरजी निकम सर यांनी भेट दिली असता त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी आमदार महोदय यांनी शुभेच्छा देताना भविष्यात महाकाली देवस्थान हे तालुक्यातील एक नामांकित तीर्थक्षेत्र होईल अशा शुभेच्छा दिल्या तसेच येणाऱ्या काळात पर्यटन क्षेत्रातून व शासनाच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ घेऊ असे सांगितले.पालकमंत्री श्री.उदयजी सामंत साहेब यांनी सहकार्य दिल्याने आमदार महोदय यांनी आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी जिल्हा नियोजन समिती सदस्य दादासाहेब साळवी,तालुकाध्यक्ष अबूशेठ ठसाळे,माजी पंचायत समिती सदस्य बाबूशेठ साळवी,शशांक पवार,उपविभागीव वन अधिकारी दीपक खाडे,अमोल काटकर,भाई पवार,श्रीराम पवार,संजय बामणे,शंभू मानकर,भाई शिंदे,निलेश कोलगे,गणेश कोळगे,छोटू कोलगे,किसन पवार,सुरेश पवार,प्रकाश पवार,उस्मान सय्यद,अब्दुल सय्यद,प्रशांत पवार,निशांत पवार,वैभव पवार,अप्पा इंदुलकर,किशोर मानकर,संजय घाग आदी मान्यवर उपस्थित होते..