पुनर्वस्नातील प्रलंबित असलेल्या एकूण 23 कबाले प्रमाणपत्रांचे वाटप
धाराशिव : उमरगा तालुक्यातील मौजे.तुगाव येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याने विविध योजनांच्या माध्यमातून मंजूर असलेल्या 7 कोटी 80 लक्ष 75 हजार रुपयांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, समुद्राळ भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन पद्माकरराव हराळकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
तसेच तुगाव पुनर्वसनावेळच्या अनेक जणांना त्यांच्या हक्कांचे कबाले गेल्या अनेक वर्षापासून मिळाले नव्हते. कबाले संदर्भात चे प्रस्ताव हे गेले कित्येक वर्ष प्रलंबित स्वरूपात होते. त्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यशस्वी पाठपुरावा करून तुगाव येथील पुनर्वसनातील प्रलंबित एकूण 23 कबाले प्रमाणपत्रांचे यावेळी वाटप केले. कबाले संदर्भात सतत पाठपुरावा करत असलेले प्रा.ज्ञानेश्वर हराळकर यांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांचेकडे केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचें उपस्थित ग्रामस्थांसमोर आभार मानले.
तुगावं हे गाव अनेक ठिकाणी वसलेले असल्याने आमदार चौगुले यांच्या माध्यमातून ज्या ज्या भागात निधी मंजूर केल्याने चौगुले वस्ती, माने वस्ती, भास्कर नगर, बिराजदार वस्ती येथील ग्रामस्थ व राष्ट्रीय चर्मकार महासंघ, ग्रामपंचायत कार्यालय च्या वतीने व उमेद संदर्भात व आशा कार्यकर्त्या संदर्भात पाठपुरावा केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील महिलांच्या वतीने मोठ्या प्रमाणात राख्या बांधण्यात आल्या.
सदर कार्यक्रमात आमदार ज्ञानराज चौगुले बोलताना म्हणाले की , “मी मतदार संघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असून तुमच्या समस्या या माझ्या समस्या समजून त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन. येणाऱ्या पुढील काळात शेत तिथे रस्ता ही योजना प्रभावीपणे राबविन. तसेच प्राप्त निवेदनातील चर्मकार बांधव समाज मंदिर, भवानी मंदिर ते भोसगा शेतरस्ता, येणेगुर ते तुगाव पाणंद रस्ता, महिला केंद्र इमारत बांधणे आदी कामे निवडणुकीनंतर लागलीच मंजूर करून घेणार” असे यावेळी उपस्थिताना सांगितले.
तसेच युवासेना मराठवाडा अध्यक्ष किरण गायकवाड यांनीही विकास कामांचा पाढा वाचत आमदार ज्ञानराज चौगुले यांना पुनश्च विधानसभेत पाठवावे अशी उपस्थित ग्रामस्थ यांना विनंती केली.
यावेळी जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, सरपंच दीपक जोमदे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास बिराजदार, भाजपचे रमेश मुळे हबीब मुजावर, उपसरपंच संजय बिराजदार, सोसायटी चेअरमन धनंजय माने, माजी सरपंच शिवाजी चव्हाण, शेषराव माने, श्रद्धानंद माने, अप्पू बिराजदार, गोविंद माने, शाहूराज भोसले, विशाल चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य हणमंत शिंदे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर हराळकर यांनी मानले.
सचिन बिद्री