सैफ अली खानवर खरंच हल्ला झाला की तो अॅक्टिंग करतोय असा संशय असल्याचं व्यक्तव्य मंत्री तथा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे. राणे म्हणाले, बांग्लादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. नालायकपणा किती आहे. आधी फक्त नाक्यावर उभे रहायचे. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. सैफ बाहेरुन असा चालत होता की, मलाच संशय आला याला खरच कोणी चाकू मारला की हा अॅक्टिंग करुन बाहेर पडला. असं टुणटुण करुन” असं राणे एका भाषणात म्हणाले.
#SaifAliKhan #NiteshRane #SaifAliKhanAttack #BJP
