जामखेड प्रतिनिधी

आज सोमवार दिनांक ९/६/२०२५ रोजी सकाळी दहा वाजता श्री संतोष नवलाखा यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोनवर माहिती दिली की, एसटी स्टँड समोरील साईबाबा हॉस्पिटल आणि घोडके हॉस्पिटल येथील रोडच्या मध्यभागी एक माणूस पडलेला आहे. सदर माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे स्वतः आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्या जखमी व्यक्तीचे नाव दादा राम माने (वय ५०) असून ते जामखेड येथील मिलिंद नगर भागात राहत होते. यावेळी ती व्यक्ती पालथी पडली होती. त्या व्यक्तीस स्वतः उचलून सोबत संजय गळगटे, इस्माईलभाई पाट्यावाले, संतोष नवलाखा यांनी मदत केली. सदर व्यक्तीस त्यांनी रुग्णवाहिकेने आणून जामखेड येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी तपासणी करून मृत घोषित केले. सदर इसमाची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड येथील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून पुढील चौकशी चालू आहे.

यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले की, अशा अनोळखी बेवारस लोकांना उचलण्यासाठी किंवा अपघातातील जखमी लोकांना उचलण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. तसेच सरकारी दवाखान्यात पोस्टमार्टम रूम मध्ये मृत व्यक्ती उतरवण्यास कर्मचारी पण नाहीत, ही मोठी खेदाची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *