SHARAD PAWAR | राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दिली आहे.
शरद पवार यांना कफ झाल्याने बोलताना त्रास होत आहे. यामुळे त्यांना कार्यक्रमांमध्ये भाषण करण्यास त्रास होत आहे. या कारणाने त्यांचे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे, पक्षाकडून कळविण्यात आले आहे.