महाराष्ट्रात अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावरून सरकारला लक्ष्य केले जात आहे यावर माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, ‘तुम्ही लोकांनी ती सांगितली तितकी मोठी घटना नाही. मलाही १४ गोळ्या लागल्या. घटना घडत राहतात. कदाचित ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत होती. प्रसिद्धी मिळवण्याचा त्याचा हेतू असा होता की जर आपण सैफ अली खानला मारले तर आपण प्रसिद्ध होऊ. पण ही काही मोठी घटना नाहीये. देवाने सैफ अली खानला वाचवले आहे आणि आता तो बरा होत आहे. आता तुम्ही या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारू शकत नाही.