बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीस जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असून आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे. तसेच बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत, असं या अहवालात म्हटलं आहे.