सैनिक सीमेवर लढत असल्याने आपण देशात सुरक्षित आहोत.देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाला विविध अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळे
संघटनेच्या वतीने मागील १४ वर्षांपासून माजी सैनिकांचा मेळावा घेण्यात येतो. वीरपत्नी व वीरपीता व मातांचा सत्कार करण्यात येतो, असे प्रतिपादन जिल्हा सैनिक अधिकारी कर्नल शरद
पांढरे यांनी या सोहळ्यात व्यक्त केले.

भारतीय माजी सैनिक संघटना व माजी सैनिक पतसंस्थेच्या वतीने बुधवारी वीरमाता, वीरपत्नी,माजी सैनिक मेळावा घेण्यात आला. प्रारंभी अमर जवान स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन शहीद
जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी आमदार प्रवीण स्वामी, कर्नाटक बसवकल्याण माजी सैनिक संघटना अध्यक्ष कॅप्टन बाबू गोरटे, हुमणाबादचे अध्यक्ष डॉ. तेलंग,महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अरुण तळीखेडे, भूम अध्यक्ष किसन चौधरी, संपादक रामेश्वर धुमाळ,
संयोजक तथा भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शहाजी चालुक्य म्हणाले की,
मागील १४ वर्षांपासून हा सन्मान सोहळा सुरू आहे.

देश,महाराष्ट्र व कोणत्या जिल्ह्यात असा कार्यक्रम होत नाही. शासकीय दरबारी वीरमाता,वीरपत्नी यांचाच सत्कार होतो.दिवंगत माजी
सैनिक पत्नींचा येथे सन्मान होत असल्याने १५ डिसेंबर २०१३ रोजी राष्ट्रपती, संरक्षणमंत्री, चिफ आर्मी कमांडर यांच्या हस्ते सामाजिक कार्याबद्दल माझा सन्मान झाला होता.जिल्हा ध्वज निधी संकलनातून जमा झालेला ८० टक्के निधी जिल्हा कल्याणकारी योजनेत यावा. राजकीय नेते सैनिकांना मान देतात म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत ३२ माजी सैनिकांना संधी मिळाली. आज त्यांचा सन्मान करून सर्वपक्षीय नेत्यांचे आभार व्यक्त केले. यासाठी अशोक सूर्यवंशी, घनश्याम
पाटील, वाल्मिक भोसले, गोविंद काळे, राजेश बेंडकाळे, ज्ञानेश्वर पवार, बब्रुवान गायकवाड,सावित्रा पतंगे, शेषेराव जाधव यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. खंडू दूधभाते व
सरीता उपासे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बेंडकाळे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सांगता
करण्यात आली.या सोहळ्यात सात वीरपत्नी, सामाजिक कार्य करणारे ३२ माजी सैनिक, १५० दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.