♦️जिल्हाधीकाऱ्यांच्या मुख्याधीकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना
उमरगा :धाराशीव जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदे अंतर्गत व उमरगा नगर परीषदेत बँकांचा कर्ज बोजा नोंद करुन घेणेसाठी व भुमीअभिलेख कार्यालयास पी.आर. कार्ड देण्यासाठी आदेशीत करणेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी जिल्हाधिकारी सचिन ओम्बांसे यांना दि .६ रोजी निवेदन दिले.
जिल्हाधिकारी श्री ओम्बांसे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा तालुका हा सिमावर्ती भागातील दुष्काळग्रस्त तालुका असुन अविकसीत तालुका आहे. उमरगा शहरात मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेमुळे व शैक्षणीक सुविधांमुळे विकसीत होत आहे. यात मोठ्या विस्तृत व सुसज्ज इमारतींची मोठी आवयश्क्ता आहे. उमरगा शहराचा सिटी सर्व्हे न आल्याने उमरगा नगर परीषद बँकांचा बोजा नोंद करुण घेत नाही. त्याच धर्तिवर भुमी अभिलेख कार्यालय पि.आर. कार्डही उपलब्ध करुण देत नाही. यामुळे बँका बांधकामासाठी कर्ज देत नाहीत. या सर्वांचा परीणाम उमरगा शहराच्या विकासावर होत असुन अनेक मोठे प्रोजेक्ट, बांधकाम ,ईमारती बांधकाम स्थगीत व ठप्प झाले आहेत.तरी उमरगा शहराच्या विकासाठी सदरील नगर परीषद व भूमी अभिलेख कार्यालयास पा.आर. कार्ड देण्यासाठी व बोजा नोंद करण्यासाठी आदेशीत करावे . असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे .
या निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी श्री ओम्बासे यांनी मुख्याधिकाऱ्यांना आदेशित करत जमाबंदी आयुक्ताकडे भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे सदर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत .