♦️गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भारतीय कापूस निगमचे कापूस खरेदी केंद्र नियमित सुरु ठेवणेकरिता तात्काळ कार्यवाही होणे बाबत.
विषयांकित प्रकरणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कापूस उत्पादक असून, त्यांचे आर्थिक भवितव्य कापसाच्या योग्य दराने विक्रीवर अवलंबून आहे. मात्र सध्या भारतीय कापूस निगम (CCI) चे खरेदी केंद्र कधी बंद कधी चालु असल्याने, शेतकऱ्यांना आपल्या कष्टाने पिकवलेल्या कापसाची योग्य बाजारपेठ मिळत नाही. परिणामी, 50% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा कापूस अजूनही त्यांच्या घरी पडुन आहे.


शासनाच्या हमी भावानुसार (MSP) कापूस खरेदी व्हावी, याकरिता CCI ची खरेदी केंद्रे सुरु असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतू खरेदी केंद्रे बंद असल्याने शेतकरी खुले बाजारपेठेवर अवलंबून राहत असून, त्यांना नाईलाजास्तव हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विक्री करावा लागत आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसत असून, मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
करिता, भारतीय कापूस निगम चे कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तसेच, खरेदी केंद्र कधी बंद कधी चालु का आहे? याबाबतची प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आणि आर्थिक संकटांपासून वाचविण्यासाठी तात्काळ कार्यवाही व्हावी, हि विनंती आ . प्रंशात बंब यांनी मा .ना . श्री . माणिकराव कोकाटे साहेब मंत्री कृषी यांच्याकडे केली आहे …