गडचिरोली,

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील चित्र वेगाने बदलत आहे. सत्ताधारी महायुती आपली सत्ता कायम टिकवण्यात यशस्वी ठरली, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले.सत्ता आणि राजकीय भविष्याचा विचार करुन बाहेर पडणारे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत.
अहेरी विधानसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री अंब्रिशराव आत्राम यांचे समर्थक मूलचेरा तालुक्यातील मलेझरी येथील सामाजिक कार्यकर्ता अरुण शेडमाके यांनी एकनाथ शिंदे, मंत्री संजय राठोड, पुर्व विदर्भ संगठन मंत्री किरण पांडव यांच्या उपस्थितीत नागपुरात शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी गडचिरोली शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

भास्कर फरकडे एन टिव्ही न्युज मराठी गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *