GADCHIROLI | डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी बाबू कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नुकतेच कुरेशी यांना नियुक्तीपत्र देवून सत्कार केला. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक इक्बाल शेख, विदर्भ समन्वयक सतिश आकुलवार,राज्यकार्यकरणी सदस्य रजत दायमा,धाराशिव जिल्हाध्यक्ष अय्युब शेख, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके,नागपूर शहर अध्यक्ष अनिल बालपांडे आदी उपस्थित होते.
गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे दिनांक २६ फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत राजा माने म्हणाले की, संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बाबू कुरेशी आणि उपाध्यक्ष धुर्वे यांनी गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल मिडिया प्रतिनिधींचे मजबूत संघटन उभारले आहे. यातूनच गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाबू कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेत ठसा उमटविला आहे. पत्रकारांच्या समस्यांची सोडवणुक करतानाच डिजीटल मिडियात गुणात्मक बदल होण्यासाठी ते निश्चितच भरीव योगदान देतील असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य समन्वयक इक्बाल शेख म्हणाले की, डिजीटल मिडिया सध्या प्रभावी भूमिका बजावत आहे. ज्येष्ठ पत्रकार डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी संघटनेचे पहिलेच राज्य अधिवेशन महाबळेश्वर जवळील भिलार येथे घेतले. राज्यातील 1200 प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. आता गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी कुरेशी यांच्यावर सोपविण्यात आली असून ते गडचिरोली जिल्ह्यात चांगले संघटन उभे करतील असा विश्वास आहे म्हणत गडचिरोली जिल्ह्याच्या नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपाध्यक्ष अरुण दुर्वे, सचिव सुरेश मोतकुरवार, कोषाध्यक्ष भास्कर फरकडे सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली. रमेश चौखुंडे, प्रल्हाद मेश्राम, दुर्वास मशाखेत्री, माणिकचंद रामटेके, संजय दुर्वे, केतिकराम आरके, रुपेश सलामे यांचीही जिल्हा संघनेत विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी बैठकीत वडसा, चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा तालुक्यातील डिजिटल, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे संपादक, पत्रकार उपस्थित होते.

बाबू कुरेशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *