छत्रपती संभाजीनगर (ग्रा.) पोलीसांची कार्यवाही.
छत्रपती संभाजीनगर
करमाड पोलीस ठाणे येथे दिनांक १७/०२/२०२५ रोजी फिर्यादी नामे पोपट बाबुराव मुरे रा. वैजापूर ता.जि. छत्रपती संभाजीनगर ह.मु. छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस ठाणे करमाड येथे हजर येवून अशी फिर्याद दिली कि दि. १४/०२/२०२४ रोजीचे पुर्वी पंचतारांकीत शेंद्रा MIDC येथे लहूकी फाटा ते हुसंग कंपनी पर्यंतचे उच्च विद्युत दाब वाहिनीचे कॉपर केबल किंमत अंदाजे ४९,००,०००/- रूपयाचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इरादयाने चोरून नेले वगैरे मजकूराचे फिर्यादीवरून पो.स्टे. करमाड येथे गुरनं ६५/२०२५ कलम ३०३(३) बीएनएस-२०२३अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
नमूद गुन्हयांचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉ.विनयकुमार राठोड यांचे व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्था.गु.शा सतिष वाघ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह नमूद गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचे केबल हे खूप जास्त होल्टेजचे असून सदर ठिकाणी केबल कट करत असतांना चोरी करणा-या इसमास जोराची स्पार्किंग होऊन कट करणारा इसम हा गंभीर जखमी झालेला असावा. त्याअनुषंगाने तपास करत असतांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, केबल चोरी व भंगार चोरी करणारा एक इसम नामे संतोष बन्सी जाधव रा. शहानगर, चिकलठाणा याने सदरचा गुन्हा केला असून केबल कट करत असतांना त्यास शॉक लागल्यामुळे त्याचे दोन्ही हात जळाले असुन व चेह-यावर इजा झालेली आहे तो सध्या त्याच्या घरी आहे.
इसम नामे संतोष बन्सी जाधव यास शहानगर चिकलठाणा परिसरातून चौकशी कामी ताब्यात घेतले व त्याचे दोन्ही हात व चेहरा कशाने तरी भाजल्याचे दिसले त्यास त्याबाबत व गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगीतले की मी, माझे साथीदार नामे साजिद उर्फ बाबा शाह यांच्यासह काही दिवसापूर्वी आम्ही शेंद्रा एमआयडीसी मध्ये एका बोगदयामध्ये केबल चोरी करण्यासाठी गेलो असता केबल कट करत असताना त्या केबलचा शॉक लागून तिथे स्पार्किंग झाल्याने माझे हात व चेहरा भाजला होता व यापूर्वी आम्ही अनेकदा सदर ठिकाणाहून केबल चोरी केलेली आहे असे सांगितले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याने सदर ठिकाणाहून मी व माझ्या साथीदारासह इतर ही ९ जणांनी वेळोवेळी केबलची चोरी केली आहे व चोरी केलेले कॉपरचे केबल भंगार व्यापारी नामे १) असद सत्तार करेशी रा. सील्लीखाना २) सलीम खान रा. भारत बाजार चिकलठाणा ३) गणेश निकाळजे रा. शहानगर चिकलठाणा यांना वेळोवेळी विक्री केल्या बाबतची कबुली दिली, त्यानंतर स्था. गु.शा तपासपथकाने संतोषने सांगितलेले त्याचे इतर सर्व साथीदार व चोरीचे केबल खरेदी करणारे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची व गुन्ह्यातील चोरी गेला माल विकत घेतल्याची कबुली दिली, स्था.गु.शा पथकाने एकूण १५ इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून गुन्ह्यात चोरी गेलेले ४२ मीटर कॉपर केबल किंमती ८,१३,९४३/- रुपयाचे, नगदी रुपये २,७०,०००/-, गुन्ह्यात वापरलेले वाहने एक मोटार सायकल व एक टाटा कंपनीची छोटा हत्ती गाडी किमती ४,००,०००/- रुपये किंमतीच्या, आरोपीचे एकूण ०४ मोबाईल फोन ७२,०००/- रुपयाचे, असा एकुण १५,५५,९४३/-(पंधरा लाख पंचावन्न हजार नऊशे त्रेचाळीस) रुपये किंमतीचा मुद्देमाल व १५ इसम यांना वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई कामी पोलीस ठाणे करमाड येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड,अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह,यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सपोनि पवन इंगळे, पोह/नामदेव शिरसाठ, पोह/कासीम शेख, पोह/श्रीमंत भालेराव, पोह/वाल्मीक निकम, पोह/सुरेश सोनवणे, पोह/शिवानंद बनगे, पोह/नरेंद्र खंदारे पोना/अशोक वाघ, पोना/विजय धुमाळ, पो.अ./आनंद घाटेश्वर, पो.अ./राहूल गायकवाड, पोअं. योगेश तरमाळे, पोह/निलेश कुडे, पोअ/संजय तांदळे, पोअं/शिवाजी मगर, पोअं/संतोष डमाळे, यांनी केली आहे.
N TV न्युज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी