अहेरी (गडचिरोली)
आल्लापल्ली येथे बस स्टँड जवळ काल सायंकाळी अत्यंत दुदैवी घटना घडली आहे. शिक्षक शंकर गावडे (वय 55 वर्ष) हे रस्ता पार करून पायी जात असतांना नागपूर येथील कुमार ट्रान्सपोर्टचे ट्रकने मागून शिक्षक शंकर गावडे यांना जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झाले.
आलापल्ली बस स्टँड येथे दुकानाचे अतिक्रम वाढल्यामुळे लोकांची खूप वर्दळ असते, त्या ठिकाणी खाजगी वाहने सुद्धा उभा करतात. या ठिकाणी लोकांना उभा राहण्यासाठी जागा अपुरी पडते, तरीपण खाजगी वाहने उभे करतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. त्याकरिता शासनाने अतिक्रमण करून दुकाने टाकलेले आहे .त्यांना हटवणे व खाजगी वाहनांना उभ्या करण्यास बंदी घालने ही जनतेची मागणी आहे.
नातेवाईकांकडे लग्न समारंभ असल्याने शिक्षक शंकर गावडे हे आपल्या पत्नीसह आलापल्ली येथील मुख्य बाजारात आले होते. त्यांची पत्नी ही सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती व शिक्षक गावडे हे आपल्या सवंगडी शिक्षकासोबत चहा घेण्यासाठी थांबले होते.
चहा घेऊन ते बुट पॉलीश करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे व बस स्टँड जवळ जात असतांना मागून ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना त्यांचे पत्नीला समजताच त्यांनी हंबरडा फोडला. हे चित्र मनाला हेलावून टाकणारे होते. त्यांचे या अचानक जाण्याने गावडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिक्षक शंकर गावडे यांचा मृतदेह पोस्टमोर्डम करण्यासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय आणण्यात आला होता. याची माहिती आविसं, काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतकाचे पोस्टमॉर्डम होईपर्यंत उपस्थित राहून स्वर्गरथ गाडी उपलब्ध करून देऊन मृतक शिक्षक शंकर गावडे यांचा मृतदेह स्वगावी पाठवण्यात आला.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, बबलू सडमेक सर, रवी येमसलवार सर, अविनाश सडमेकसह परिवारातील नातेवाईक आदी उपस्थित होते.
शंकर मुत्येलवार
एन टीव्ही न्यूज अहेरी गडचिरोली