योगाजी कुडवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी
गडचिरोली : तालुक्यातील रामपूर या साजावर दहा वर्षापासून ठाण मांडणाऱ्या तलाठी अजय तुनकलवार यांची बदली करावी, अशी मागणी आदर्श समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष योगाजी कुडवे यांनी केली आहे.
याबाबत २ मे रोजी कुडवे यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, तलाठ्याची बदली तीन वर्षात होणे अपेक्षित आहे, पण तलाठी तुनकलवार हे दहा वर्षांपासून गडचिरोली साजा व रामपूर साजामध्ये ठाण मांडून आहेत. त्यांच्या कार्यकाळातील अवैध रेती उत्खनन, वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ केल्याची प्रकरणे याची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी देखील कुडवे यांनी केली आहे.
भास्कर फरकडे प्रतिनिधी एन टिव्ही न्युज मराठी गडचिरोली