अंकीसा – सिरोंचां तालुक्यातील अंकिसा गावात आज दिनांक 16/06/2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय इमारतीत आदिवासी विकास विविध सेवा सहकारी संस्थेच्या 05 जागेसाठी निवडणूक झाली यात सर्वसाधारण 02 जागा , इतरमागस वर्ग 01 , एस सी 01, एन टी 01 असे 5 जागेसाठी लढत झाली , आणि एस टी 07 उमेदवार बिन विरोध निवडून आले.सदर मतदान बॅलेट पेपर ने झाला असून उमेदवारांचे भविष्य मतदान पेटीत बंद आहे . पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये. निवडनुक शांत तेत पार पडला.4.00 वाजता मत मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली यात शेतकरी सहकारी पॅनल सतीश गांजीवर बाजार समिती अध्यक्ष, भंडारी श्रीहरी उपाध्यक्ष जिल्हा मध्यवरती बँक यांच्या नेतृत्वात विजयी झालेले यात नागेंद्रचिटकेशी ,मनोहरअरिगेला ,प्रवीण अकुला , कार्तिक जंगम, पल्लंम मारालू , विजयी झाले. विरोधी पक्षाचे एकही उमेदवार जिंकले नाही.
प्रतिनिधी – देवेंद्र कुमार रंगू
सिरोंचां गडचिरोली