गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे

गंगापूर तालुक्यातील वाहेगाव शिवारात काल अर्ध्या रात्री बिबट्याने एका बकरीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहेगाव येथिल रहीवाशी हरिश्चंद्र जगन्नाथ हिवाळे गट नंबर ३० येथे ही घटना घडली आहे

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला असुन आवाज ऐकून शेतकरी बाहेर आले, मात्र तोपर्यंत बिबट्याने बकरी ठार केली होती . आवाज व हालचाल लक्षात घेत बिबट्या शेतातील ऊसामध्ये पसार झाला.

वनविभागाला या घटनेबाबत कळविण्यात आले. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *