N Tv News: कोपरगाव अपडेट
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाऊच बुद्रुक शिवारातील उंबरी नाल्याजवळ ८ ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपीने साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून सदर महिलेचा खून तिचा नवरा संजय हिरामण मोहिते (वय ३७, रा. सोनार वस्ती, ता. कोपरगाव) याने आपल्या साथीदार मेव्हण्यासह मिळून कौटुंबिक वादातून केला असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षा मोहिते असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास सहा दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. सदर प्रकरणातील फरार साथीदाराचा शोध शहर पोलीस घेत आहेत.
N Tv News Marathi🎥📷 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा : 9028903896