हिंगोली : जिल्ह्यातील दिव्यांगाना शासनाकडून मदत मिळवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र काढण्यासाठी हिंगोली जिल्हा रुग्णालयात खेटे घालावे लागत होते यामुळे येथील दिव्यागांनी खासदार हेमंत पाटील यांना यासंदर्भात माहिती दिली होती याची दखल घेत खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील चार ही तालुक्यात सामान्य रुग्णालयात तपासणी व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच अनुषंगाने आज जागतिक अपंग दिनानिमित्त सेनगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणी केलेल्या दिव्यांगाना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले

यावेळी सेनगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्री सचिन राठोड,राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सौ वैशाली ताई वाघ, पत्रकार श्री वाघ , डॉ पाटील मॅडम ,श्री प्रेमचंद कंडेरे( कनिष्ठ लिपिक ) प्रतिमा बगाटे मॅडम ,श्री गणेश गिरी ,अश्विनी तुपे मॅडम , श्री अनिल नायकवाल ( औषध निर्माण अधिकारी )श्री शिवाजी अवचार ,श्री संदीप मोरे (कक्ष सेवक ) श्री भगत ,श्री झगरे ,आम्ले सिस्टर ,तुपे सिस्टर ,बर्डे मॅडम ,श्री गिरी, श्री मनोहर धवसे , तसेच श्री गजानन दराडे (वाहन चालक) वाहन चालक श्री शुभम धाबे आदी कर्मचारी ,दिव्यांग बांधव उपस्थित होते.