पारगावचा मल्हारी आंतरराष्ट्रीय रंगमंचावर!
50 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले.
कुस्तीच्या मैदानात भारताचे प्रतिनिधित्व.
वस्ताद करपे तात्यांचे मोलाचे मार्गदर्शन.
AHILYANAGAR | पारगावचा मल्हारी रावसाहेब जाधव आंतरराष्ट्रीय रंगमंचावर उझबेकिस्तान मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कर्नाटक बेळगाव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये त्याने 50 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आणि याच विजयामुळे त्याची निवड उझबेकिस्तान मध्ये झाली. त्याचे वस्ताद करपे तात्या यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले आहे. त्याच्या पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानागर
