गंगापूर | प्रतिनिधी अमोल पारखे
दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासोबतच शारीरिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास व्हावा, या उद्देशाने गंगापूर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये आरोग्य समुपदेशन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.

दि. २८ जानेवारी २०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर श्री. दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभर हा उपक्रम राबविण्यात आला. मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या सूचनेनुसार व उपजिल्हा रुग्णालय गंगापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाळांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळांमध्ये संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व, योग्य खाण्यापिण्याच्या सवयी, वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याच्या सवयी, स्वच्छ पाण्याचा वापर, स्क्रीन टाइम मर्यादा व डोळ्यांची काळजी, मोबाईल-संगणक व सोशल मीडियाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, विविध व्यसनांचे दुष्परिणाम तसेच किशोरवयीन आरोग्य समस्या, तणाव व भावनिक बदल यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथील डॉ. सुदाम लगास, डॉ. हर्षल धाबे, डॉ. पवन मुंदडा, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. वेदपाठक, डॉ. सूर्यवंशी, डॉ. शिवाजी म्हस्के, डॉ. सुनील शेजुळे, डॉ. विशाल उईके, डॉ. विनायक टीके, डॉ. शिवाजी निकम, डॉ. शितल वेणीकर, डॉ. शुभांगी कुदळे, डॉ. प्राची पाटील, डॉ. किरण शेवाळे, डॉ. राजश्री नरवडे यांच्यासह शरद जाधव, वैशाली मांडले, उदावंत, कांबळे, प्रविण क्षीरसागर, रविंद्र घोडके, दत्ता लोंढे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
