अहिल्यानगर :
डॉक्टर क्षेत्रात अतिशय प्रभावी नाव असलेल्या आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या ॲक्युपंक्चर विभागाच्या अहिल्यानगर जिल्हा सचिव या पदावर डॉ. गणेश निवृत्ती तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ही संस्था संपूर्ण भारतात तसेच भारताबाहेरही आयुष चिकित्सा पद्धतींच्या प्रचार, प्रसार व संघटनासाठी कार्यरत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे दि. १ फेब्रुवारी रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र महाअधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनात महाराष्ट्रातील आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा, नॅचरोपॅथी, युनानी तसेच ॲक्युपंक्चर क्षेत्रातील नामवंत चिकित्सक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनात आयुष चिकित्सेचा प्रभावी प्रचार-प्रसार, संघटन विकास व भविष्यातील दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. याच वेळी संघटन बळकटीसाठी अनेक महत्वाच्या मुख्य पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, त्यामध्ये डॉ. गणेश निवृत्ती तनपुरे यांच्या निवडीचा समावेश आहे.
या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, चेअरमन डॉ. सतीश कराळे, अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवठकर यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. गणेश निवृत्ती तनपुरे यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विष्णु पुरी, अहिल्यानगरच्या आरोग्यवर्धिनी संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा शेलोत, डॉ. शैलजा घुले, डॉ. झवर सर, ॲड. श्री सुभाष काकडे, ॲड. श्री सौरभ काकडे, ॲड. श्री राजेंद्र शेलोत, योगशिक्षक श्री सुनील देशपांडे, उद्योजक श्री गौरव परदेशी तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
