गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही बनावट नंबर प्लेटच्या वाहनातून अवैधरीत्या दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि अहेरी पोलिसांनी आलापल्ली येथे संयुक्त सापळा रचून तब्बल १४ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उभी असलेल्या एका संशयास्पद काळसर तपकिरी रंगाच्या बोलेरो कॅम्पर वाहनाची (क्र. MH 12 SX 6981) पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
एकूण जप्त मुद्देमाल १४,८७,२००/- रुपये आहे.
संबंधित वाहनावर बनावट नंबर प्लेट लावून ही दारू विक्रीसाठी आणण्यात आली होती. याप्रकरणी अहेरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि. हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी शंकर मुत्येलवार एन. टीव्ही न्यूज मराठी गडचिरोली
