GADCHIROLI | एटापल्ली येथे ‘हर घर तिरंगा’ तसेच ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा उत्साहात समारोप करण्यात आला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ बटालियनच्या पुढाकाराने जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला.


विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. यावेळी तिरंग्याचे महत्त्व, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय प्रतीकांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘वंदे मातरम्’ गीताचे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ बटालियनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

प्रतिनिधी | एनटीव्ही न्यूज मराठी | एटापल्ली


#Etapalli #HarGharTiranga #VandeMataram #Gadchiroli #NTVNewsMarathi #MarathiNews #BreakingNews #MaharashtraNews #DeshBhakti #Tiranga

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *