• ‘हर घर पपई’ आणि १००० झाडांचे वाटप; लोकवर्गणीतून विकासकामांचा धडाका..!

सावनेर प्रतिनिधी | दि. १६ फेब्रुवारी २०२६

नागपूर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सावनेर तालुक्यातील उमरी (भ.) ग्रामपंचायतीला गुरुवारी (दि. १२) अप्पर उपायुक्त विवेक इमले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीने राबवलेले कल्पक उपक्रम आणि विकासकामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

याप्रसंगी सरपंच भास्कर कचडे यांनी अप्पर उपायुक्त विवेक इमले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि गावातील प्रगतीचा अहवाल सादर केला.

उमरी ग्रामपंचायतीचे पथदर्शी उपक्रम

अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने राबवलेल्या काही विशेष उपक्रमांचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले:

  • हर घर पपई: पर्यावरणाचे रक्षण आणि सकस आहारासाठी गावात ‘हर घर पपई’ हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये सुमारे १००० पपईच्या रोपांचे (२ ते २.५ फूट उंचीची) वाटप करण्यात आले.
  • रक्तदान शिबीर: सर्वोदय क्रीडा मंडळ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
  • जल व मृद संधारण: वनराई बंधाऱ्यांचे बांधकाम करून पाणी अडवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
  • लोकसहभाग: लोकवर्गणीतून तलाठी कार्यालयाचे काम पूर्ण करणे ही बाब संपूर्ण तालुक्यात विशेष ठरली आहे.
  • पायाभूत सुविधा: पांदण रस्ता निर्मिती, रस्ता दुरुस्ती आणि अतिक्रमण हटाव मोहीम राबवून गावच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला.

उपस्थित मान्यवर

या आढावा बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त दया राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंशुजा गराटे, गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर, विस्तार अधिकारी प्रशांत घुगल आदि जिल्हा आणि विभाग स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी उपसरपंच विनोद उलमाले, ग्रामपंचायत सदस्य सीमा टोंगे, सपना ताजने, गोविंदा ढोके, माजी सभापती यादवराव ढोके आणि संगणक परिचालक लक्ष्मी बल्की यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशासकीय समाधान

अप्पर उपायुक्त विवेक इमले यांनी उमरी ग्रामपंचायतीच्या पारदर्शक आणि वेगवान कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. “लोकवर्गणी आणि प्रशासकीय निधीचा योग्य मेळ घालून उमरीने आदर्श पंचायतराजचे उदाहरण समोर ठेवले आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.


प्रतिनिधी मंगेश उराडे, एनटीवी न्यूज मराठी, नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *