छ.संभाजीनगरच्या “चाईल्डहूड” मित्र मंडळाच्या उपक्रमास संपादक राजा माने व लेखक शाहू पाटोळे यांची उपस्थिती

छ. संभाजीनगर, दि,९-

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 गव्हर्नरपदी येथील सतीश लोणीकर यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा चाईल्डहूड मित्र मंडळाच्यावतीने किराणा चावडी येथील हॉटेल ग्रँड मधुरम मध्ये छोटेखानी कार्यक्रमात संपादक राजा माने व लेखक शाहू पाटोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आता.

सतीश जी लोणीकर यांची रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदी २९२८-२९ सालासाठी निवड झाल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व संपादक राजा माने यांच्या हस्ते व प्रख्यात लेखक शाहू पाटोळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रोटेरियन सुरज डूमणे, अमित कोरडे, चाईल्डहूड मित्र मंडळ चे सदस्य दगडोजीराव देशमुख शैक्षणिक समुहाचे सर्वेसर्वा विजय राऊत , उद्योजक विवेक जयस्वाल, विजय जैस्वाल,जितेंद्र भारुका, मनीष जयस्वाल, पुष्कर जयस्वाल, अनिरुद्ध जयस्वाल आदी उपस्थित होते. यावेळी सतीश लोणीकर यांनी रोटरी इंटरनॅशनल जगभर राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *