छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर, येथे
दि. २ मे: २०२६ रोजी गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त पदमपूरा येथे शनिवारी, २ मे रोजी आध्यात्मिक भक्तिभाव आणि सामाजिक एकात्मतेचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला. आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने आयोजित भिक्खू संघाच्या अन्नदान सोहळा आणि रॅलीने संपूर्ण परिसराला बौद्धमय केले.
पूज्य प्रा. भिक्खुणी धम्मदर्शना महाथेरी आणि पूज्य भिक्खू ज्ञानरश्मी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहात पार पडला.
भक्तिभावात न्हालेली भव्य रॅली
सकाळी पद्मपूरा परिसरातून भिक्खू संघाची रॅली काढण्यात आली. भगव्या वस्त्रातील भिक्खू संघाला पाहताच संपूर्ण परिसर ‘
बुद्धम् शरणम् गच्छामि
’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. रॅलीच्या स्वागतासाठी माता-भगिनींनी सकाळपासूनच घरासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या होत्या. मार्गावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून नागरिकांनी भिक्खू संघाचे वंदन केले. दारोदारी भिक्खू संघाचे दर्शन घेण्यासाठी महिला,भगिनी, पुरुष बांधव आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्नदानाने झाला सोहळ्याचा समारोप
रॅलीनंतर भिक्खू संघाला विधिवत अन्नदान करण्यात आले. शील, करुणा आणि मैत्रीचा संदेश देणाऱ्या या पवित्र प्रसंगी उपस्थित सर्वांनी बुद्धवंदना करून शांततेचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्रपाली महिला मंडळाच्या अध्यक्षा हेमाताई बतूलै यांच्यासह निर्मलाबाई वाहुळकर, शिलाबाई शिरसाट, रमाबाई गायकवाड, राधाबाई जाधव, रुपाबाई जाधव, पूजा भालेराव, कांताबाई, शिला पारेल, प्रतिभा मगरे, माया जाधव, मंगल मोरे, नंदा मोरे, मनीषा बनकर, सुरेखा घाटे, सिंधुताई एडके, नंदाताई एडके, हिराबाई, संगीता ढेपे, लताबाई पैठणे, आशा भराडे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा हा सोहळा पदमपुऱ्यातील नागरिकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील.

एन. टीव्ही. न्युज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *