हा पुरस्कार छ. संभाजीनगर पालक मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते देऊन सन्मानित

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजीनगर: कर्तव्यनिष्ठ सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांना पोलीस महासंचालकांचे सर्वोत्कृष्ट सन्मानचिन्ह पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे पोलीस दलातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार्याचा गौरव
स.पो.नि. भरत मोरे यांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि संवेदनशील गुन्ह्यांचा जलद तपास करण्यासाठी सातत्याने धडाकेबाज कामगिरी केली आहे. अवैध धंद्यांवर केलेल्या कारवाया, जनतेशी थेट संवाद आणि गुन्हे उकल करण्यातील कौशल्यामुळे त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
सन्मानाचे महत्त्व
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून दरवर्षी राज्यातील कर्तव्यदक्ष, शौर्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘DG’s Insignia & Commendation Certificate’ म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट सन्मानचिन्ह पदक’ देऊन गौरविले जाते. हा सन्मान पोलीस दलातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.
स.पो.नि. भरत मोरे यांना पदक सन्मान मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सहकारी व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. “हा सन्मान संपूर्ण टीमचा आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करता आले. हा पुरस्कार माझी जबाबदारी आणखी वाढवतो,” अशी भावना स.पो.नि. मोरे यांनी व्यक्त केली.
स.पो.नि. भरत मोरे यांच्या निस्वार्थ व कर्तव्यतत्पर सेवेची दखल घेत
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण: पोलीस दलात प्रामाणिकपणा, धाडस आणि तपासकौशल्याचा आदर्श ठरलेल्या सहायक पोलीस निरीक्षक भरत उत्तम मोरे यांना त्यांच्या १९ वर्षे १० महिने १७ दिवसांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. सध्या ते पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे वाचक म्हणून कार्यरत आहेत.
दि. १३ जून २००६ रोजी पोलीस दलात रुजू झालेल्या मोरे यांनी अहिल्यानगर, धुळे, बीड आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या चार जिल्ह्यांमध्ये आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली आहे. नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव शहर, धुळे शहर, आष्टी, कडा दुरक्षेत्र, फर्दापूर आणि शिवूर पोलीस ठाण्यांमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
गुन्हे उकलण्यात दाखवला दरारा
मोरे यांच्या कारकिर्दीत अनेक गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला. शिवूर पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना ५ राज्यांतून फरार असलेल्या अट्टल एटीएम चोरट्याला त्यांनी एटीएम मशिन आणि १५ लाख २० हजार ५००रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद केले.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात असताना नागपूरमधून अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याला थेट मध्यप्रदेशातील देवास येथे नेऊन ५० तोळे सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई त्यांच्या तपासकौशल्याची आणि निर्धाराची साक्ष ठरली.
३०० हून अधिक गुन्ह्यांचा तपास, ९ खुनांची उकल
फर्दापूर, शिवूर, आष्टी, धुळे शहर, श्रीगोंदा, नेवासा आणि कोपरगाव शहर अशा ७ पोलीस ठाण्यांच्या कार्यकाळात मोरे यांनी ३०० हून अधिक गुन्ह्यांचा तपास केला. त्यात ९ गंभीर खुनांच्या प्रकरणांचा समावेश आहे. प्रत्येक तपासात त्यांनी दाखवलेली सूक्ष्मदृष्टी आणि कायद्याची बांधिलकी यामुळे ते सहकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले.
सेवेचा अलंकार
उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सेवाकाळात ३११ बक्षिसे आणि ११ प्रशंसापत्रे मिळाली आहेत. मागील १९ वर्षांत त्यांनी अबाधित ठेवलेला सेवावृत्तीचा आलेख हाच त्यांचा सर्वात मोठा गौरव आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे वाचक म्हणूनही ते आजही त्याच निष्ठेने कर्तव्य पार पाडत आहेत. धैर्य, प्रामाणिकपणा आणि जनसेवेचा वसा जपणाऱ्या भरत मोरे यांच्या कार्याचा हा सन्मान संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

एन. टीव्ही न्यूज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *