- एसएससी परीक्षेत ८४.८०% गुण मिळवून समीक्षा पाटील विद्यालयात तृतीय.
- विद्यार्थिनीसह पालक सुनील पाटील व विद्या पाटील यांचा विशेष सत्कार.
- माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्याकडून विद्यार्थिनीचे कौतुक व शुभेच्छा.
- यशाचे श्रेय आजी-आजोबा, आई-वडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला.
NANDED | कंधार येथील प्रियदर्शिनी मुलींच्या विद्यालयात एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यामध्ये कु. समीक्षा सुनील पाटील हिने ८४.८० टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
समीक्षा पाटील हिच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा तसेच तिचे पालक सुनील पाटील आणि विद्या पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ईश्वरराव भोसीकर तसेच संस्थेचे सचिव संजय भोसीकर यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास मिरा मॅडम, पाटील सर, प्रा. ढगे सर, प्रा. विलास कुलकर्णी, प्रा. दिग्रसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या यशाबद्दल बोलताना कु. समीक्षा पाटील हिने या यशाचे श्रेय आजी-आजोबा, आई-वडील तसेच शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. तिच्या या यशामुळे मित्रपरिवार, शिक्षक आणि परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्यालयाच्या या निकालामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
प्रतिनिधी, कंधार
