जाफराबाद प्रतिनिधी :
ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६” यंदा प्रा. शरद अंबादास पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.
समाजप्रबोधन, शिक्षण प्रसार, युवकांना प्रेरणा देणारे कार्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता समृद्ध लॉन्स, पोलिस स्टेशनजवळ, बायपासनगर, कन्नडवाडे नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे शुभहस्ते मा. आनंदराज आंबेडकर साहेब (इंडियन रिपब्लिकन मोर्चाचे नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू) यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या गौरवाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच मित्रपरिवारातून प्रा. शरद अंबादास पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *