( प्रतिनिधी जाफराबाद)
येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विज्ञान शाखेची पदवीधर विद्यार्थिनी कु.प्राची सुनिल मेढे हिची बॅक ऑफ बडोदाच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदी निवड झाली असुन प्राची मेढे यांच्या यशाचे जाफराबाद पंचक्रोषित कौतुक होत आहे.तिच्या यशाबद्दल सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दादासाहेब म्हस्के, संस्थेचे सन्माननीय सचिव प्रा डॉ राहुलजी म्हस्के, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य .डॉ.सविता सिनगारे व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शाम सर्जे , उपप्राचार्य प्रा.विनोद हिवराळे तसेच महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा अनिल वैद्य ,व महाविद्यालयातील प्राध्यापक व, शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु-भगिनी यांनी अभिनंदन केले.कु.प्राची मेढे यांना तिचे काका आयु.सुधाकर मेढे व आयु.कारुजी सुखदेवे व तिचे मामा आयु.सुनिल सुखदेवे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तिच्या यशाच्या पाठीमागे तिची आई सौ. सुजाता मेढे,मृणाल मेढे व सुशांत मेढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *