- जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार सत्कार सोहळा संपन्न.
- वाणिज्य शाखेत कार्तिक इनामे (94%) तर विज्ञान शाखेत श्रुती पाटील व वैभवी सरकटे यांनी मारली बाजी.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आधुनिक सुविधांचा लाभ घेण्याचे डॉ. राहुल म्हस्के यांचे आवाहन.
- कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल 78.11%; यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव.
JALNA | येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राहुलजी म्हस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थी हीच महाविद्यालयाची संपत्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
voice: या सोहळ्याप्रसंगी उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनील मेढे, डॉ. शाम सर्जे आणि प्रा. विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचा निकाल ७८.११ टक्के लागला असून २६९ पैकी २०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत रजनी चव्हाण (७९.८३%), वाणिज्य शाखेत कार्तिक इनामे (९४%) आणि विज्ञान शाखेत श्रुती पाटील व वैभवी सरकटे (७०.८३%) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
डॉ. म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयातील ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि स्पर्धा परीक्षा केंद्राचा वापर करून गुणवत्ता वाढवण्याचे आवाहन केले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब म्हस्के, प्राचार्य डॉ. सविता सिनगारे यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश पांडे यांनी केले तर आभार प्रा. उत्तम वाघ यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने पालक, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद जालना.
