मंगरुळपीर येथील सेतू केंद्रातून विद्यार्थ्यांची लूट:अतिरिक्त शुल्क घेत असल्याचा गंभीर आरोप
फुलचंद भगत
वाशिम:-शासनाने नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे व शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.मंगरुळपीर येथे बाहेरच्या शेतुचालकांनी आपले दुकाने थाटुन अव्वाच्या सव्वा शुल्क आकारुन लोकांची पिळवणुक होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे.बाहेरचे सेतु शहरात येवुन कसे लोखांची पिळवणुक करत आहेत याविषयीच्या तक्रारीनंतर सेतुपडताळणी करण्यात आली.कीती सेतुची पडताळणी झाली आणी कुणाकुणावर आता कारवाई होणार? की देवुनघेवुन सेटलमेंट होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या सेतुवर लोकांची जञाच पाहावयास मिळत आहे.विशेषतः शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेले उत्पन्न, जातीचे, निवासी तसेच नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र अधिकृत केंद्रात सेवा न देता काही कर्मचाऱ्यांकडून खाजगी ठिकाणी अर्ज भरून घेणे, अतिरिक्त पैसे आकारणे आणि तातडीच्या कामासाठी जादा शुल्क मागितले जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेतली जात असून पावतीही दिली जात नाही. काही वेळा “सर्व्हर बंद आहे” किंवा “काम ऑनलाइन होत नाही, अशी कारणे देत नागरिकांना बाहेरील दुकानाकडे पाठवले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.सेतू कार्यालयात कायमच नागरिकांना लुटले जाते, गावातील दिलेल्या महा ई सेवा केंद्राकडून काढलेले दाखले मुद्दाम सोडले जात नाही. त्यांना नियम दाखवला जातो, नियम सेतू चालकाचा लागू होत नाही का? ग्रामीण भागातील नागरिकांनी तहसील सेतू कार्यालयात दाखले काढण्यासाठी यावे यासाठी अडवणूक केली जाते असा आरोपही होत आहे.दरम्यान, अधिकृत सेतू केंद्रात पुरेशा सुविधा नसणे, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि नागरिकांना योग्य मार्गदर्शन न मिळणे यामुळे संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच शासनाने निश्चित केलेल्या शुल्कानुसारच सेवा देण्यात यावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.मंगरुळपीर येथील या प्रकारामुळे सेतू सेवा केंद्राच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.सेतुला मान्यता खेड्यात पण दुकाने शहरात थाटुन पैसा कमवण्याचा गोरखधंदा काही सेतुचालक करीत आहेत.अशा सेतुवर चौकशीच्या नावाखाली अशा बाहेरच्या सेतुचालकांकडुन मलिदा जमा करुन आपले खिसे सबंधित अधिकारी भरत असल्याची चर्चा आहे.दि.२ जुन रोजी सेतुची तपासणी झाल्याचे कळले पण तहसिलला किंवा सबंधित अधिकार्याकडे याविषयी माहिती नसल्याचे सांगण्यात आले.मग तपासणी कशासाठी हा प्रश्न यानिमित्ताने ऊपस्थीत होत आहे.
