फुलचंद भगत
वाशिम:-ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांचा जागर करण्यासाठी तसेच आगामी काळातील संघटनात्मक व आंदोलनात्मक दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने सावता परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेला सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कल्याणराव आखाडे (काका) मार्गदर्शन करणार आहेत. सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे यांच्या संयोजनातून ही परिषद संपन्न होत आहे.या परिषदेत अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम यासह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांतील सावता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते , हितचिंतक तसेच ओबीसी चळवळीतील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.ही परिषद हॉटेल दानिश एम्पायर, वाशीम येथे दि.७ जून २०२६ सकाळी १०:३० वाजता होणार आहे.या एकदिवसीय या परिषदेत जातीनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, सामाजिक न्याय, शैक्षणिक व राजकीय प्रतिनिधित्व, विविध प्रलंबित प्रश्न यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या आंदोलनांची व जनजागृती मोहिमेची रणनिती निश्चित केली जाणार आहे.कार्यक्रमाच्या नियोजन आणी माहीतीसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती.त्या पञकार परिषदेला सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल बानुर्गे, वाशिम जिल्हा अध्यक्ष विलास ढगे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रंजनाताई पारस्कर, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष रवीभाऊ वानखडे, शहराध्यक्ष चेतन इंगोले, वाशिम तालुका अध्यक्ष बाळूभाऊ, गजानन ठेगडे,वाशिम शहर उपाध्यक्ष सुनील वानखडे, शाम दळवी उपस्थित होते.राज्यभरातील सावता परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी तसेच विदर्भातील सर्व जिल्हा, तालुका व शहरस्तरीय पदाधिकाऱ्यांनी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिषद यशस्वी करावी असे आवाहन सावता परिषदेचे कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाडे यांनी केले आहे.
