वाशिम जिल्हा पोलीसांची विशेष मोहिम

फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस अधीक्षक वाशिम यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना जिल्ह्यात कोठेही अवैध गावठी हातभट्टी निर्मिती व दारु विक्री होणार नाही याबाबत सक्त आदेश दिले. वरुन वाशिम पोलीसांना जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध गावठी हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे सत्र सुरु केले.

दिनांक 29/05/2026 रोजी पासुन दिनांक 02/06/2026 रोजी पर्यंत वाशिम जिल्ह्यात पोलीसांनी ठिकठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणाऱ्यावर रेड केल्या असुन अवघ्या 05 दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी 78 अवैध दारुच्या रेड करुन देशी-विदेशी दारू तसेच गावठी हातभट्टी दारु असा जवळपास एकुण 18 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. व अनेक आरोपीतांवर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदरच्या धडक कारवाईमुळे अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणानले असुन वाशिम जिल्ह्यामधुन अवैध गावटी हातभट्टी दारु समुळ नष्ट करणे करीता जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री होत असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष वाशिम किंवा संबधीत पोलीस स्टेशन माहिती देण्याबाबत पोलीस अधीक्षक वाशिम यांनी नागरीकांना आवाहन केले आहे. अवैध दारुची विक्री करणाऱ्याची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे सुचित केले आहे.सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड,उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व टिम त्याचप्रमाणे सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व टिमने अथक परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *