कंधार : प्रतिनिधी शेख शादुल
काल रात्री दि.3 जून रोजी कंधार शहरात अज्ञात चोरट्यांनी हॉटेल चिंतामणी, तहसील कार्यालय परिसर कंधार येथे तोडफोड करून चोरीचा प्रयत्न/घटना घडवून परिसरात खळबळ उडवली.घटनेची माहिती मिळताच कंधारचे नगराध्यक्ष शहाजी राजे नळगे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या सोबत उपविभागीय पोलीस अधिकारी आश्विनी जगताप तसेच पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण प्रकाराची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी नगराध्यक्ष शहाजी राजे नळगे यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देताना सांगितले की, “घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून याची सखोल चौकशी करून आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी.” तसेच शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

या प्रसंगी नगरसेवक असेफ शेठ, मंडळ अध्यक्ष अॅड गंगाप्रसाद यन्नावार,माजी पं. स. सदस्य उत्तम चव्हाण,कुमार अण्णा कांबळे, काँग्रेस विधानसभा सो मि अध्यक्ष सतीश देवकते, सुरेश राठोड, पोलीस पाटील व्यंकटराव पा जाधव, नागेश पवार, गजू बडवणे, स्थानिक व्यापारी वर्ग, विविध पक्षीय पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर आरोपींना अटक करून न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींची तपासणी केली जात आहे.
