- जिओ टॉवरवरील केबल चोरीचा उलगडा
- तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक
- ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
- चोरीची केबल आणि दुचाकी हस्तगत
- कारंजा पोलिसांची यशस्वी कारवाई
- पुढील तपास सुरू असल्याची माहिती
WARDHA | कारंजा (घा.) पोलिसांनी जिओ टॉवरवरील केबल चोरी प्रकरणाचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीची केबल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारंजा तालुक्यातील बोरगाव (होले) येथील जिओ टॉवरवरून आर.आर.यू.ची ५० मीटर केबल चोरी झाल्यानंतर सुपरवायझर चांदबाबू रज्जाक खान यांच्या तक्रारीवरून कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत तीन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत अनंता सोनेबर गोसरे, प्रफुल किसनाजी ठाकरे आणि शितिल लिलाधर राजुरे यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून सुमारे १५ हजार रुपयांची चोरीची केबल आणि गुन्ह्यात वापरलेली सुमारे ५० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रल्हाद मदने, नितेश मेघेवार, मंगेश मिरके आणि दिनेश घडस यांच्या पथकाने केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
जावेद खान | एनटीव्ही न्यूज मराठी | वर्धा–पुलगाव
#NTVNewsMarathi #Wardha #Karanja #Police #CrimeNews #CableTheft #JioTower #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #LatestNews #ViralNews
